देऊळघाट (हॅलो बुलडाणा) विजेचा शॉक लागून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देऊळघाट येथे घडली.
शेख रेहान असे मृतकाचे नाव आहे. हा 22 वर्षीय तरुण टीचर कॉलनी बुलढाणा रोड देऊळघाट येथे राहत होता. अनावधनाने त्याला विद्युतवाहिनीचा जबरदस्त धक्का लागल्याने तो दगावला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.