देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) कोसळधार पावसाने जिल्ह्यात थैमान घातले.देऊळगाव राजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने आमना नदीला पूर आला. त्यामुळे नदीच्या पाण्याने शेतात आणि शाळेत शिरकाव केल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात आज सकाळी मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. आमना नदीला सुद्धा यावेळी मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीचे पाणी काठावरील शेतात तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरले आहे. शिवाय नदीकाठावरील घरांमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. नदीचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.