spot_img
spot_img

पट्टेदार वाघोबा शोधतोय शिकार! – रस्ता क्रॉसिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) वाघ मुख्यत्वे रात्रीच्या वेळी शिकार करतो.. तो वास घेण्याऐवजी दृष्टी आणि आवाजाचा वापर करून भक्ष्याचा माग काढतो…दडून पाठलाग करतो..लपून हल्ला करतो.. त्यामुळे वाघ दिसला की, अंगाचे पाणी पाणी झाल्या शिवाय राहत नाही.असाच एक पट्टेदार वाघ बोदवड मार्गावरील वनविभागाच्या गार्डन जवळ रस्ता क्रॉस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत दिसून येत आहेत. काही नागरिकांनी धाडस करून हा वाघ कॅमेऱ्यात टिपल्याचे म्हटले जात आहे.

बुलढाणा जिल्हा जंगलव्याप्त असल्याने अनेक ठिकाणी बिबट आढळून येतात.
यापूर्वी बोदवड परिसरातील रस्त्यावर अनेकदा बिबट्या आढळून आला. आता शहरी व ग्रामीण भागा लगतच्या परिसरात पट्टेदार वाघ रात्री मुक्त संचार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने परिसरातील शेतकरी,शेतमजूर व नागरिक दहशतीखाली आले आहेत. काहींनी या वाघाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकून या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जवळच सालीपुरा, गाडेगाव,आदर्श नगर आणि काही गावांमध्ये वाकोडी, लासुरा जांभूळ धाबा हे वस्त्या व गावं असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या संदर्भात वनविभाग सध्यातरी अनभिज्ञ दिसत असून या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!