spot_img
spot_img

💥तुडूंब! खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो! – एकुण 19 वक्रद्वार उघडले! – नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा!

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा / संतोष जाधव) जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा सिंचन प्रकल्प आज सकाळी साडेआठ वाजता 100 टक्के भरला असून, 50 सेमीने एकुण 19 वक्रद्वारे उघडण्यात आले आहे.नदीपात्रात 1326.96 घ.मी. विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या 33 गावांना खडकपूर्णा प्रकल्प,पूर नियंत्रण कक्ष व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

संत चोखासागर (खडकपूर्णा) हा बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन व पाणीपुरवठा प्रकल्प दमदार पावसामुळे ‘ओव्हर फ्लो’च्या स्थितीत पोहोचला आहे.प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी 520.50 असून 93.4040 दलघमी संकल्पित साठा आहे.सद्यस्थितीत 520.500 मी. एवढी पाणी पातळी असून, आजचा उपयुक्त साठा 93.404 दलघमी एवढा आहे. प्रकल्प क्षेत्रात आज 42 मिमी पाऊस झाल्याने प्रकल्प 100% भरला असून एकुण पाऊस 749 मिमी झाल्याची माहीती सुत्रांनी दिली. परिणामी खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे 50 सेमीने उघडण्यात आले आहे. दरम्यान 1326.96 घमीने 46854.96 क्यूसेक नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.प्रकल्पातील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!