spot_img
spot_img

गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समितीवर मंत्री प्रतापराव जाधव यांची नियुक्ती

बुलढाणा (हॅलो बुलढाणा)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समितीची पुर्नरचना केली असून गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समितीवर केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची नियुक्ती केली आहे…

सलग तिसऱ्यांदा श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यानंतर मंत्रीमंडळातील सदस्यांचाही शपथविधी पार पाडला नव्यानेच अठराव्या लोकसभेच्या सदस्य पदाचाही शपथविधी समारंभ झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ समित्यांची पुनर्रचना 3 जुलैला केली आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांना विशेष निमंत्रित म्हणून गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट मंत्रिमंडळ समितीवर नियुक्त केले आहे. ही नियुक्ती प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे
गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समिती ही निर्धारीत कालमर्यादेत जलद अंमलबजावणी आणि आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची ओळख करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही मंत्रिमंडळ समिती देशातील सर्व क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीवर देखरेख करते, त्यांची जलद प्रगती सुनिश्चित करते. ही समिती केंद्रीयस्तरावर सरकारी धोरणे तयार करण्यासाठी प्राथमिक संस्था म्हणून काम करत असते. राष्ट्रीय विकास उपक्रमांना पुढे नेण्यासाठी ही समिती प्रभावीपणे समन्वय साधण्याचं काम करत असते.

▪️ देशाच्या आर्थिक विकासात प्रतापरावांचाही राहणार सहभाग

देशाच्या आर्थिक विकासात भरीव काम करणाऱ्या गुंतवणूक आणि वाढीवरील कॅबिनेट समितीमध्ये
श्री प्रतापराव जाधव यांचा समावेश केल्याने देशाच्या आर्थिक विकासात आणि विकासाच्या अजेंड्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची त्यांची भुमिका राहणार आहे केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदाच मंत्री झालेले बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र नामदार प्रतापराव जाधव यांची यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेली जवळीक बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला पूरक ठरणारी आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!