spot_img
spot_img

बळीराजांची शिवार फेरी! – ११ जिल्ह्यातील हजारो शेतकरी शिवारफेरीला हजेरी लावणार! – आव्हाने व संधी यावर चर्चासत्र! – कृषी शास्त्रज्ञ डॉ.अमोल झापे काय सांगतात?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणाऱ्या शिवारफेरीची तयारी जोमाने सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, सुधारित पीकवाण व शिफारशी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही शिवारफेरी २० सप्टेंबरपासून सुरू होणार असून, तीन दिवस चालणार आहे.शेती उत्पादन वाढवा ॲग्रो विशेष मार्केट इन्टेलिजन

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ११ जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी या शिवारफेरीला हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात
आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवारफेरीचे स्वरूप बदलून ती ऑक्टोबरऐवजी सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाते.या शिवार फेरीचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन बुलढाणा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.अमोल झापे यांनी केले आहे.

विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांची शिवार फेरी दि. २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर,२०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे उद्घाटन दि.२० सप्टेंबर,२०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या शिवार फेरीचे म्हणजे थेट प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते व उद्योगधंदे भागधारक आदींना कृषी तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी,अत्याधुनिक कृषी पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी व शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतीची खात्री करून पीक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे असून या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश आहे.

▪️३०० खरीप पिक उत्पादन तंत्रांचे २५ एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी प्रात्यक्षिके!

( तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके, तेलबिया, भाजीपाला, फळपिके , चारा पिके )
विविध खाजगी कृषि निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके या तीन दिवसांमध्ये राज्यातील एकूण १,००,००० शेतकरी शिवार फेरीमध्ये सहभागी होतील असे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागाचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

▪️ प्रदेशातील कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने व संधी यावर चर्चा सत्र!

भव्य स्वरुपात कृषी उत्पादन तंत्रज्ञानाचे थेट प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके पाहण्याची आणि कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करण्याची संधी शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी दिलेली आहे.या शिवार फेरीच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यासाठी नियोजित असलेल्या दिवशी म्हणजेच दि. २० सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या शिवार फेरीचा लाभ घ्यावा.
-डॉ.अमोल एस. झापे,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख,कृषि विज्ञान केंद्र,बुलढाणा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!