बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारू विक्री व वाहतूक धडक्यात सुरु असल्याने बुलढाणा एलसीबी पथकाने कारवाईचा बडगा उगारत 14 दारूच्या बॉक्ससह 1 दुचाकी व इतर साहित्य मिळून एकुण 1,06,140 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात 14 सप्टेंबर रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम दाताळा शिवारात ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुरतसिंग नयनसिंग राजपूत वय 36 रा. घिरणी ता. मलकापूर जि. बुलढाणा याच्याकडे 56,000 रुपये किमतीचे देशी दारूचे 14 बॉक्स तसेच 50,000 रुपये किमतीची दुचाकी व अन्य साहित्य मिळून 1,06,140 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. आरोपी विरुद्ध कलम 65 (अ),(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई एलसीबी पथकातील एनपीसी अनंता फरतडे,एनपीसी सुनील मिसाळ, पीसी गणेश वाघ यांनी केली.