spot_img
spot_img

उद्या इतिहास घडणार…आपण साक्षीदार होऊ या !!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या आणि 87 वर्षांचा पत्रचळवळीचा दैदीप्यमान इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने काळाची पाऊले ओळखून टीव्ही न्यूज चॅनेल, यु ट्यूबर, वेब पोर्टल, एफएम न्यूज वाहिनी आदींसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून आपल्या अंतर्गत “डिजिटल मीडिया परिषद” विंग सुरु केली आहे. सदर परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन उद्या, 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी होत आहेत. डिजिटल मिडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली जाणार आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कँबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून एस.एम.देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुक्तपीठ” चे संपादक आणि नवा काळचे सल्लागार संपादक तुळशीदास भोईटे आणि “अभिव्यक्ती” युट्यूब चँनलचे संपादक रवींद्र पोखरकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत.
डिजिटल आणि प्रिन्ट मिडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्यक्रमाचे संयोजक तथा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे. अधिवेशनात उत्कृष्ट युट्यूब चँनल चालवून ते यशस्वी करून दाखविणाऱ्या काही संपादकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अनिल वाघमारे यांनी दिली.

बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारीआणि सदस्य संभाजीनगरला जात आहेत. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात आणि परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ यांच्या नेतृत्वात टीव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी गणेशजी सोळंकी यांची नुकतीच बुलढाणा डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष गणेशजी सोळंकी यांच्या कुशल नियोजनात आणि सचिव दिपकजी मोरे यांच्या व्यवस्थापनात एक वातानुकूलित लक्झरी बस उद्या, 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथून संभाजीनगरसाठी रवाना होत आहे. येण्यासाठी इच्छुक असलेल्या पत्रकारांनी संपर्क करावा, असे आवाहन बुलढाणा डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ 9822720784, अध्यक्ष गणेश सोळंकी 9975296123, सचिव दीपक मोरे 9673747323 तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणीने केले आहे. अभिमान बाळगा आपण सर्वात जुन्या आणि सशक्त संघटन असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य आहोत..

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!