spot_img
spot_img

💥आरोग्याशी खेळ चाले..! ‘पॅथॉलॉजी डॉक्टरच्या रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर!’

खामगाव (हॅलो बुलढाणा) एका पॅथॉलॉजी डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर, सही आणि डिग्रीचा गैरवापर करून साताऱ्यातील लॅबमध्ये खोटे रिपोर्ट देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील डॉ. ब्रम्हानंद टाले यांना नुकतेच बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेसकडून काही रिपोर्ट दाखवण्यात आले. तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले की साताऱ्यातील साखरवाडी येथील धन्वंतरी लॅबच्या रिपोर्टवर त्यांच्या नावाचा, सहीचा आणि रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर बाजूला इतर व्यक्तींची नावे नमूद करून हा रिपोर्ट जणू अधिकृत पॅथॉलॉजिस्टने प्रमाणित केला असल्याचा भास देण्यात आला होता. डॉ. टाले यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. बी.जे. राऊत, विशाल एम. नाले (डीएमएलटी), शंकर खडसे (डीएमएलटी) व प्रतीभा एम. सोळुंके (डीएमएलटी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नंतर हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
या प्रकरणी चौघांवर भादंवी कलम ३४, ४२०, ४६५, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!