spot_img
spot_img

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेला धोका? – जितेंद्र जैन यांनी काय लिहिले पत्रात? वाचाच!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) देशाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा संदर्भात चिंता व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते जैन यांनी पत्रात नमूद केले आहे की, देशाच्या सुरक्षा परिस्थिती बाबतच्या गंभीर काळजीमुळे आपल्याला हे पत्र लिहीत आहे. अलीकडच्या काळात श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि आता नेपाळ या आपल्या शेजारील देशांमध्ये होत असलेल्या गृहयुद्धासारख्या अस्थिर परिस्थितीचा परिणाम भारतावर होऊ शकतो, अशी मला भीती वाटते. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून, म्हणजेच डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवल्यापासून, त्यांच्या धोरणात एक विशिष्ट बदल दिसून आला आहे. भारता विरुद्ध त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे, आपल्या देशावर टीका करणे, दबाव आणण्याचे प्रयत्न करणे, अशा प्रकारचे वर्तन मी निरीक्षणात घेतले आहे. आशिया खंडात हळूहळू पसरत असलेली ही अशांती हेतुपुरस्सरची वाटते आणि भारताला अस्थिर करण्याची कोणतीतरी आंतरराष्ट्रीय साजिश असू शकते, अशी शंका मनात येते. अशा परिस्थितीत, देशाला लाभलेले आपले सक्षम नेतृत्व, म्हणजेच आपण, यावरच हल्ला होण्याची शक्यता वास्तविक आहे. अलीकडच्या काळातील वैमनस्य आणि अचानक येणाऱ्या मैत्रीच्या हाताच्या मागे काहीतरी दडलेले असू शकते.मी कदाचित आपल्या राजकीय पक्षाचा समर्थक नसेन, पण आज आपण माझ्या देशाचे पंतप्रधान आहात. देशप्रेम म्हणून, आपली सुरक्षा हा केवळ आपला व्यक्तिगत विषय नसून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणूनच, मी हे कर्तव्य समजून आपल्याला ही शंका आणि भीती व्यक्त करत आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षा चूक होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी माझी विनंती आहे. आपले जीवन अमूल्य आहे आणि ते देशाच्या कल्याणासाठी अत्यावश्यक आहे.कृपया अत्यंत सावधगिरी बाळगावी,असे या पत्रात म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!