बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल गणेश विसर्जनाच्या निमित्ताने बुलढाणा शहराचे मुख्य नदीघाट येळगावजवळील पैनगंगा नदी येथे प्रदूषण रोखण्यासाठी हॅपी रिव्हर कम्युनिटीने ऐतिहासिक पाऊल उचलले. विसर्जनावेळी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जमा झालेले हार, फुले, दुर्वा व निर्माल्य थेट नदीत फेकले जाण्याऐवजी स्वतंत्रपणे जमा करण्यात आले.
यात तब्बल 3 टन निर्माल्य गोळा करण्यात आले असून त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होण्यापासून मोठा बचाव झाला आहे. या उपक्रमाला बुलढाणा शहरवासीयांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विसर्जनावेळी पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करत नदीत निर्माल्य टाकणे टाळले.हॅपी रिव्हर कम्युनिटीचे हे कार्य केवळ निर्माल्य संकलनापुरते मर्यादित नसून नदी-तलाव वाचवण्याचा व्यापक जनआंदोलना चा भाग आहे. प्रदूषणमुक्त जलस्रोत हीच खरी श्रद्धा हे बोधवाक्य घेऊन ही मोहीम राबवली जात आहे.