डोणगाव (हॅलो बुलढाणा) लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार या त्रिकुटांनी डोणगाव जवळील शेलगाव देशमूख ते विशवी रस्ता 6 महिन्यापूर्वी केला होता मात्र रस्त्यावरील डांबर गायब होऊन गिट्टी उघडी पडली आहे. परिणामी आता झालेला खड्डेमय रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे. दरम्यान दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
डोणगाव जवळील शेलगाव देशमूख ते विशवी रस्ता 6 महिन्यापूर्वी केला होता.डांबरीकरण करताना पुरेसा डांबराचा वापर न केल्याने ठिकठिकाणी टाकलेली खडी उखडून खड्डे पडलेत.रस्ता आता उखडला असून या रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणासाठी खड्डे खोदण्याची व्यवस्था करीत आहे, असा प्रश्न प्रवासी व या मार्गावरील नागरिक विचारीत आहेत.रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विरोधी पक्षही यावर चुप्पी साधून असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.