बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवाला आरोग्यसेवेची जोड देत, येथील कारंजा चौकातील फ्रेंड्स गणेश मंडळाने काल आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. शुगर व बीपी तपासणीचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला.
शहरातील कारंजा चौक येथील फ्रेंड्स गणेशोत्सव मंडळ दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवीत असते.5 सप्टेंबरला देखील त्यांनी धार्मिक परंपरा जपत आरोग्य सेवेचा उपक्रम राबविला.या उपक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला.सदर आरोग्य शिबिरात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र,कारंजा चौक बुलढाणाच्या डॉ.सुनिता बडगे,चेतन लहाने,निलेश जुमडे,सुरेखा गायकवाड,अर्चना मोरे,विजया ठाकरे, शीतल कंकाळे यांनी सेवा दिली.शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे यतीन शर्मा,पवन डोंगरदिवे,आर्यन शर्मा,ओम
कायस्थ,शुभम कायस्थ,अथर्व परांजपे,वंश शर्मा,धीरज व्यास,ओम वर्मा,काव्य वेदमुथा,अभिनव भगत,अभिनव भगत, लकी शर्मा,आलोक चंदन,वंश जोशी,सुनदाय महाजन,कृष्ण चंदन यांनी परिश्रम घेतले.