spot_img
spot_img

गुटखा तस्करीला बुलढाणा एलसीबीचा जबरदस्त आळा – लाखोंचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक!

खामगाव (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी असतानाही तस्करांनी आपला अवैध धंदा सुरूच ठेवला आहे. मात्र, बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) टीमने शनिवारी खामगाव तालुक्यात थरारक कारवाई करत तब्बल 50 लाख 35 हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य साठा वाहनासकट जप्त केला. या धाडसी कारवाईत एक तस्कर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील आंबुलकर यांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. पारखेड फाटा येथे नाकाबंदी करून संशयित वाहन अडविण्यात आले. तपासणीदरम्यान अवैध गुटख्याचा प्रचंड साठा उघडकीस आला. पोलिसांनी रामराज दुल्हारे (48, रा. फतेपुर, उत्तरप्रदेश) या आरोपीसह वाहन जप्त करून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.ही धाडसी मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत अविनाश जायभाये यांच्यासह दिपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले व चालक निवृत्ती पुंड यांनी सिंहाचा वाटा उचलला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!