बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा उचलत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नव्याने नोंद करण्यात आलेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे.या संदर्भात किरीट सोमय्या हे बुलढाणा येथे येऊन गेले आणि बुलडाणा तहसील प्रशासनाने 110 नागरिकांची जन्म-मृत्यूची नोंद रद्द केली आहे.
यात नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा समावेश असून तहसीलदार यांच्यामार्फत दिलेले जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र कायम आहे.महत्त्वाची बाब म्हणजे रद्द झालेल्या जन्म मृत्य प्रमाणपत्र फक्त मुस्लिम समाजाचेच नव्हे तर इतर समाज बांधवांचे देखील रद्द झाले आहे. प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेल्या लोकांची नावे यादी मध्ये तपासून घ्या आणि ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे ते पुन्हा आपला प्रस्ताव बुलडाणा तहसील कार्यालयात सादर करू शकतात.