बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना आगळे वेगळे अभिवादन केले. भर पावसात स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन शहरातून दिंडी काढण्यात आली. दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालसमोर शरद जोशी यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही. शरद जोशी यांनी कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी. यासह इतर मागण्या करण्यात आल्या. या दिंडी दरम्यान गळ्यात आणि हातात हातकाळी घातलेल्या शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
- Hellobuldana