spot_img
spot_img

रात्री अवैध वाळूच्या ट्रकसह 1520,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात अवैध वाळू वाहतूक सुरू असून, 3 सप्टेंबर रोजी शहरातील एचडीएफसी चौकात गस्तीवर असलेल्या एलसीबी पोलिसांनी 2 ब्रास अवैध वाळू सह एक ट्रक असा एकूण 1520,000 रुपयांच्या मुद्देमालाच्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.आकाश रमेश सोखंडे,मयूर रमेश उज्जैनकर दोघे रा. मलकापूर असे आरोपींची नावे आहे.

महसूल यंत्रणा व पोलीस विभाग कितीही दक्ष असला तरी,शहरात रात्री बे रात्री अवैध वाळू वाहतूक धडाक्यात सुरु आहे. वाळू माफिया कुणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने शहरातील एचडीएफसी चौकात 3 सप्टेंबर रोजी गस्त घालत असताना,एक वाजून 35 मिनिटांनी नाकाबंदी केली असता, एका एमएच 28 बीबी 4974 क्रमांकाच्या लेलँड ट्रक मध्ये अंदाजीत 20,000 रुपयांची दोन ब्रास वाळू आढळून आली.चालकाकडे परवाना नव्हता. त्यामुळे चालक आणि ट्रक मालका विरुद्ध 302(2)बीएनएस सहकलम 21(1)21(2) दोन खनिज अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सदर कारवाई एएसआय ओमप्रकाश सावळे, एएसआय राजकुमार राजपूत,एचसी
दिगंबर कपाटे, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, पीसी दीपक वायाळ, गडकर, चालक राहुल बोर्डे या पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!