बुलढाणा (हॅलो बुलढाणा/ राजेंद्र घोराडे) बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यावर विजेचे खांब कृत्रिम रोषणाईने लखलखत आहेत,आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराला सर्वांग सुंदर बनवण्यासाठी झटत आहेत,व त्यात त्यांना पुरेसे यशही मिळतांना दिसत आहे.पण सुसंस्कृत म्हणवणाऱ्या बुलढाणा शहरातील काही हॉटेल व्यावसायिक, तर काही नालायक लोक शिक्षणाची गंगा म्हणवल्या जाणाऱ्या विद्यालय व महाविद्यालयांना गटारगंगा बनववित आहेत.स्थानिक भारत विद्यालय व जिजामाता महाविदयालय,ही दोन्ही महाविद्यालये अंबा देवी ते लक्ष्मी देवी या दोन्ही देवीच्या मंदिराच्या दरम्यान येतात.या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिजामाता महाविद्यालय,व भारत महाविद्यालय यांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावर पडलेली प्रचंड घाण,मेलेली कुत्री,सडलेली डुकरे यांची विल्हेवाट कुणी लावायची? हा प्रश्नच आहे.
▪️ मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष..
नगरपालिकेचे मुख्याधिकारी विविध डॉक्टरांच्या घरी पाहुणचार घेण्यात मग्न दिसतात,पण हजारो विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ होऊ शकेल असे साथीचे रोग निर्माण करू शकणाऱ्या घाणीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोण घेणार?
विविध हॉटेल व्यावसायिक व चैतन्यवाडीतील काही नालायक लोकांच्या बेजबाबदार वागण्याने हा रस्ता ओलांडताना नाकाला रुमाल बांधावाच लागतो,तरी अशा बेजबादार लोकांच्या बेशिस्त वर्तनावर कार्यवाहीसाठी नगरपालिका काही उपाय करेल का ? असा प्रश्न अनेक पालक विचारत आहेत.