चिखली (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.दरम्यान चिखली हद्दीत पथक गस्त घालत असताना,अवैध 8 ब्रास वाळूचे विना परवाना दोन ट्रक जप्त केले आहे. 80,000 रुपये किंमतीची वाळू व ट्रक असा 50,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीत 28 ऑगस्ट रोजी मलगी फाट्या नजीक दोन ट्रक विना परवाना अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान सदर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला नाकेबंदी करून झाडाझडती घेतली असता, दोन्ही ट्रकमध्ये 80,000 रुपये किमतीची 8 ब्रास वाळू आढळून आली. ट्रक व वाळू असा एकुण 50,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी विरोधात कलम 303 (2) बीएनएस सहकलम 21(1),21(2) गौणखनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एएसआय राजकुमार राजपूत, ओमप्रकाश सावळे,एचसी गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, दीपक वायाळ या पथकाने केली.