spot_img
spot_img

अरे रे! 4 काळवीटाच्या शिकारीनंतर मांस विक्री! – एक जिवंत काळवीट व मांस जप्त! – शिकारी जाळ्यात फसलेच नाही!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काळवीटाची शिकार करुन मांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वनविभागाला मिळताच त्यांनी शेळगाव आटोळ ते अंचरवाडी शिवारात धाव घेतली.यावेळी रस्त्यावरील एका शेतात काळवीटाचे मांस विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी शेजारील मका पिकात फरार झाले. शिकारी जाळ्यात फसलेच नाही.ही कारवाई 24 ऑगस्ट रोजी करण्यात आली. घटनास्थळावरुन 1 कापलेला व 1 जिवंत काळवीट,1 मोटरसायकल 4 चामडे व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बुलढाणा वन परिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते अंचरवाडी रस्त्या जवळ एका शेताला लागून काळवीटाची शिकार करुन मांस विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळताच डीएफओ सरोज गवस, एसीएफ वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी वनपाल मोहसिन खान, वनरक्षक गजानन पोटे, समाधान झोटे वन मजूर प्रवीण सोनुने,पवन मुळे यांनी रवाना केले.घटनास्थळी काही जण काळवीटाची शिकार करुन मास विक्री करीत असल्याचे दिसून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी घटनास्थळावरून बाजूच्या मका पिकात फरार झाले.यावेळी कर्मऱ्यांनी पंचनामा करुन शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास सुरु असल्याची माहिती आरएफओ सुनील वाकोडे यांनी 24 ऑगस्टला रात्री 9 वाजेच्या सुमारास दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!