spot_img
spot_img

गुटखामाफीयाच्या आवळल्या मुसक्या! – 77 लाखाचा मुददेमाल जप्त!

मेहकर (हॅलो बुलढाणा) पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनिय बातमीदारामार्फत 21 ऑगस्ट रोजी माहीती मिळाली की समृदधी महामार्गावरुन एका आयशर वाहनातुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक होत आहे यावरुन त्यांनी सदर माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना याबाबत अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन पहाटे 04.00 सुमारास समृदधी महामार्गावरील नागपुर ते मुंबई वाहीनीवरील चॅनल नंबर 282 जवळ मिळालेल्या माहीतीचे अनुषंगाने सापळा लावुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) वाहतुक करणारा एक आयशर टेम्पो पकडला व त्याची तपासणी केली असता त्यात पुर्ण भरलेला शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थाची (गुटखा) मिळुन आला.

त्यावरुन सदर मुददेमालावर कारवाई करणेकरीता अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग किर्ता वसावे यांना पत्र देवुन बोलावुन घेवुन मुददेमाल तपासला असता एकुण 65,52,000 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ (गुटखा) व 12,00,000 रु चे आयशर वाहन असा एकुण 77,52,000 रुपयांचा मुददेमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सदर गुन्ह्यात एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून अजुन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. निष्पन्न आरोपी पकडणेकरीता पथक तयार करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार हे करीत आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, पोउपनि वसंत पवार, पोउपनि गणेश कड, पोउपनि संदीप मेधने, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई, रमेश गरड, संजय पवार, सुरेश काळे, लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शरद कापसे, करीम शहा, इब्राहीम परसुवाले, शिवाजी चिम, संदीप भोंडणे यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे व त्यांचे सहकारी यांनी मिळुन केलेली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!