बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी चिखली रोडवर असलेल्या इंटेरियर डिझायनर हरीश शर्मा यांच्या खंडेलवाल फॅब्रिकेशन वर्कशॉप मध्ये आग लागून लाखोंचे आर्थिक नुकसान झाले. दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीने काही क्षणांतच रंगसाहित्य आणि इतर साहित्य भस्मसात केले.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र आग एवढ्या झपाट्याने पसरली की आसपासच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विजेचा शॉर्टसर्किट किंवा रंगसाहित्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिखली रोडवरून केंब्रिज स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावर हे वर्कशॉप असल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दाट धुरामुळे परिसरात एकच गोंधळ आणि घबराट पसरली होती