नांदुरा (हॅलो बुलढाणा) सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुप्त माहिती मिळाल्यावरून बुलढाणा व नांदुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.या कारवाईत तब्बल 41 तलवारी बाळगणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. आरोपी
कडून 41 तलवारीसह 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशेष म्हणजे कारवाई करणाऱ्या संपूर्ण पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी 10 हजारांचा कॅश रिवार्ड जाहीर करण्यात आला आहे.
नांदुरा पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी एक संशयित इसम अवैध हत्यार बाळगून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.या संदर्भात खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना देण्यात आली होती.दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी 3 पथक पाठवण्यात आले होते. 2 अधिकारी व 4 अंमलदारांनी आरोपी वसीम शेख सलीम रा. नांदुरा याला शिताफिने पकडले. त्याच्याकडून 41 तलवारीसह दुचाकी व मोबाईल असा एक लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संपूर्ण पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईसाठी प्रोत्साहन म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दहा हजारांचा कॅश रिवार्ड जाहीर केला आहे.संपूर्ण टीमची कारवाई संदर्भात प्रशंशा केली जात आहे.