बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रिमझिम पाऊस, सजलेले देखावे , कालभैरवाची भली मोठी मूर्ती त्यासमोर नंदी व त्यापुढे भक्ती भावे थीरकणारी तरूणाई असे दृश्य काल कावड यात्रेत दिसून आले. काल भैरव कावड यात्रेचे हे चौथी वर्ष होते.
दरवर्षी तरुण वर्गाकडून ही यात्रा आनंदात उत्साहात साजरी केली जाते.बुद्धेश्वर ते कोलवड अशी ही कावड यात्रा निघाली. गर्द वनराईने नटलेल्या डोंगरातून रात्री बारा वाजता कावड यात्रेला सुरुवात झाली. खांद्यावर कावड घेऊन मोठा जमाव निघाला होता.ठिकठिकाणी कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केले तर काही ठिकाणी चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.18 ऑगस्ट रोजी श्रावणाच्या चौथ्या सोमवारी हे आयोजन करण्यात आले. दुपार दरम्यान कोलवड येथे कावड यात्रा पोचली. 25 किलोमीटरचे हे अंतर तरुणाईने रात्रीच्या अंधारात पार केले. रिमझिम पावसात भक्ती भावे यात्रा यशस्वी पार पडली. या साठी कालभैरव कावड यात्रेचे समस्त पदाधिकारी,कोलवड ग्रामस्थानी विशेष परिश्रम घेतले.जय भोले शंकराचा गजर करीत कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.