spot_img
spot_img

💥EXCLUSIVE हिरवे स्वप्न गेले वाहून..! – गेल्या तीन दिवसात 73 बाधित गावातील 902 हेक्टर पिक उध्वस्त!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात बारा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक देऊळगाव राजा तालुक्यातील 64 तर सिंदखेडराजा तालुक्यातील नऊ अशी एकूण 73 गावे बाधित झाली आहे.त्यामुळे 902 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिके उध्वस्त झाली आहे.14 ते 17 ऑगस्ट दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचा हा प्राथमिक अहवाल आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.नदी नाल्यांना पूर आला तर शेतात पाणी शिरल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.देऊळगाव राजा येथील 64 गावे बाधित झाली तर 450 हेक्टर क्षेत्र पिक भुईसपट झाले. सिंदखेडराजा तालुक्यातील 9 गावे बाधित झाली असून 452 हेक्टर वरील पिकांवर पाणी फेरले गेले.
तीन दिवसात एकुण 902 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशी,तूर ही पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!