चिखली (हॅलो बुलढाणा) कालपासून रिपरिपत असलेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय. चिखली-बुलढाणा मार्गावरी राऊतवाडी थांब्या जवळील जांबुवंती नदी दुथडी भरुन वाहत असल्याने पुलावरून पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे व राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या नदीची भिंत फुटून पाण्याचा विसर्ग होत असल्याने चिखली- बुलढाणा रस्ता वाहतुकीसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे.दरम्यान तहसीलदार यांनी आज व उद्या चिखली तालुक्यातील शाळा,कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
जांबुवंती नदीला पूर आला असून, तीन ते चार तासांपासून पूलवरून धो- धो पाणी वाहत आहे. त्यात राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या नदीची भिंत फुटून बाहेर येणाऱ्या पाण्याने भर घातली असून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.दरम्यान पोलीस विभाग,महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.