बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने एका शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची स्वातंत्र्यदिनी खळबळजनक घटना घडली. विनोद पवार असे त्यांचे नाव आहे. परंतु आज पहाटे सहा वाजता पासून बचाव पथक त्यांचा शोध घेत असून, अद्यापही पवार यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
आंदोलनावेळी यंत्रणेने डोळेझाक केली, असा आरोप होत आहे.जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिगाव प्रकल्पावर जिगाव पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलन झालीत. मात्र यंत्रणेला काही फरक पडला नाही. दरम्यान काल रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. आडोळ खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनात विनोद पवार नामक शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली आहे. जल समाधी आंदोलन दरम्यान नदीत उडी घेतल्यानंतर कोणीही विनोद पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली परंतू त्यांना यश आले नाही.आज पहाटेसहा वाजताच्या दरम्यान विलास निंबोळकर यांच्या नेतृत्वात जीवरक्षक ओम साई राम फाउंडेशन टीम नांदुरा आणि रुक्माई जीवरक्षक फाउंडेशन टीम तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक आपत्ती विभागाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाने बचाव टीम शोध कार्य करीत आहे.