spot_img
spot_img

नक्षली भागात ‘खाकी’ची चमकदार कामगिरी! – पीएसआय सह चार अंमलदारांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यातील गडचिरोली व गोंदिया भागातील नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता खडतर सेवेतील दमदार कामगिरी करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील 4 पोलीस अधिकाऱ्यासह अंमलदार यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.मुंबईचे

पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने ही घोषणा करण्यात आली.सध्या स्थानिक गुन्हे शाखेतील पीएसआय म्हणून कार्यरत असलेले पीएसआय प्रतापराव बाजड यांनी मार्च 21 ते जुलै 24 दरम्यान गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियान राबवून शांतता व सुरक्षितता प्रस्थापित केली. लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पडल्या.नक्षलग्रस्त भागातील मुला मुलींसाठी मोफत स्पर्धा प्रशिक्षण व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडले.सदर कालावधीमध्ये 79 मुलेमुली शासकीय सेवेत रुजू झाली. गावोगावी ग्रंथालय कार्यान्वित केली.त्यामुळे प्रतापराव बाजड यांना ‘विशेष सेवा पदक’ घोषित करण्यात आले आहे.तसेच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर आंधळे, जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुपाजी तायडे व सिसिटीएनएस खामगाव मध्ये कार्यरत असलेल्या महिला अंमलदार पंचगंगा भोजने यांना देखील हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांनी नक्षलवादी विरोधी अभियान राबवून शांतता प्रस्थापित केल्याने व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्याने तसेच त्यांच्या सेवेतील कार्यकाळामध्ये गोपनीय माहिती काढून वरिष्ठांपर्यंत पोहचविल्याने नक्षलग्रस्तांच्या विध्वंसक कार्यवाहीला प्रतिबंध लावता आला आहे. या कामगिरीमुळे 4 पोलीस व अंमलदार यांना ‘विशेष सेवा पदक’ घोषीत करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!