spot_img
spot_img

पंतप्रधानांचा स्वच्छतेचा मुलमंत्र..इकडे नगरपालिकेचे वेगळेच तंत्र..! – अत्यल्प वेतनामुळे सफाई कामगारांचे आमरण उपोषण सुरु!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचा मंत्र जपत असताना बुलढाणेकरांनी केलेला कचरा उचलून स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे अत्यल्प वेतनही नगरपालिकेकडून वेळेवर देण्यात येत नाही. त्यामुळे वेतन वाढविण्याच्या मागणीसाठी सफाई कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शिवाय संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेने दिला आहे.

दिवसभर सफाईचे काम करणाऱ्या या कंत्राटी कामगारांना अत्यल्प वेतन मिळते आणि तेही वेळेवर मिळणार नसेल तर उपाशी कामगारांनी काय करायचे? असा सवाल विचारला जात आहे.सफाई कामगारांना कायद्याप्रमाणे तसेच सीएसआर दराप्रमाणे किमान वेतन अपेक्षित. आहे.परंतु ठेकेदार याकडे दुर्लक्षित आहे. त्यामुळे 5 ऑगस्टला हा प्रश्न घेऊन अखिल भारतीय मजदूर संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नये,असे निवेदन दिले होते.परंतु या निवेदनाला केराची टोपलीच दाखविण्यात आली.त्यामुळे सफाई कामगारांकडून 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!