बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) काका आणि पुतणी यांच्यामधील नातं वडील आणि मुली प्रमाणेच असतं.परंतु नात्याला काळीमा फासणार्या एका घटनेत काकाने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घटना संग्रामपूर तालुक्यातील आहे.
आमच्या प्रतिनिधीच्या माहितीनुसार, काकाने चक्क अल्पवयीन पुतणीला वासनेची शिकार बनविल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षापासून हा कुकर्मी काका अल्पवयीन पुतणी सोबत लैंगिक अत्याचार करीत होता. या कुकर्माचा व्हिडिओ काढून व्हायरल
करण्याची धमकी द्यायचा. दरम्यान 4 वर्षांनंतर त्रास असाह्य झाल्याने वैतागलेल्या
पुतणीने काकाच्या पापाचा घडा फोडला. पोलिसांना आपबीती कथन केल्यानंतर पोलिसांनी आरोपी काका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.