बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात व तालुक्यात ठीक ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे.
सचिन सूर्यवंशी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी वेळोवेळी लोक हितकारक मागण्या रेटून धरल्या.त्यांच्या काही मागण्या पूर्ण देखील झाल्या.आता त्यांनी शहरात व प्रत्येक तालुक्यात महिला सुरक्षिततेसाठी पोलीस चौकी उभारण्याची आणि पोलीस संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.