spot_img
spot_img

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ साजरा करणार गणेशोत्सव पत्रकार भवनसमोर होणार ‘वृत्तेश्वर’ची स्थापना

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्रीगणेशाला बुद्धी, ज्ञान, कला आणि विद्येची देवता संबोधले जाते. पत्रकारिता एक विद्या आहे आणि कला सुद्धा आहे. त्यामुळे येणारा गणेशोत्सव पत्रकारितेचा उत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने वृत्तेश्वर अर्थात वृत्तांचा ईश्वर “गणेशाची” स्थापना करण्याचे निश्चित केले असून या दहा दिवसीय उत्सवात सामाजिक उपक्रमांना प्राधान्यासोबत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनावर भर दिला जाणार आहे. पहिल्यांदाच पत्रकारांच्यावतीने आयोजित या गणेशोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केले आहे.

गणेशोत्सवाला समाजकार्याची जोड मिळाली की, असा उत्सव लक्षवेधी ठरतो. या संकल्पनेची मांडणी करीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी जिल्हा कार्यकारिणीसमोर गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या अनुषंगाने 12 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, सरचिटणीस कासीम शेख, कार्याध्यक्ष वसीम अन्वर शेख, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद जाधव, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक राजेश डिडोळकर, डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाट, समन्वयक सुधाकर मानवतकर, शहराध्यक्ष राम हिंगे, सचिव इसरार देशमुख, प्रसिद्धीप्रमुख निनाजी भगत, उपाध्यक्ष सुनील मोरे, कोषाध्यक्ष अजय राजगुरे, सहप्रसिद्धी प्रमुख अभिषेक वरपे, महिला सेलच्या मृणाल सोमनाथ सावळे, सुरेखा सोमनाथ सावळे यांसह अनेकांची उपस्थिती. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करावे, हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!