बुलढाणा (हॅलो बुलडाणा) डोंगर खंडाळा रोडवर आज दुपारी दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विशाल इंगळे (27, वरवंड) आणि अनिल हाडे (45, डोंगर शेवली) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे, अपघाताच्या ठिकाणी मदतीसाठी कोणीही थांबण्यास धजावत नसताना, चिखलीतील माँ रेणुका देवी गोरक्षण संस्थेचे संचालक हे उदयनगरहून बुलढाण्याकडे जात असताना त्यांना हा प्रसंग दिसला. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली गाडी थांबवून जखमींना उचलले, तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे उदाहरण घालून दिले. रस्त्यावरच्या दुर्घटनांमध्ये ‘माझं काय जातंय?’ हा भाव ठेवणाऱ्यांसाठी ही घटना चपराक ठरावी. अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळाले नसते, तर जीवितहानीची शक्यता नाकारता आली नसती. अशा वेळी संवेदनशील नागरिक आणि त्वरित मदत करणाऱ्या हातांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
- Hellobuldana