बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बिबट्या-लांडगा एकत्र आले.. मग झाले काय? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. बुलढाण्याच्या घाटात बिबट्या व लांडगा वाटसरूच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.
लांडग्यांच्या शिकारीसाठी बिबट्याचा प्रयत्न होता की, काय? हे कळले नाही मात्र बिबट्याचा रुबाब पाहता, तो शिकारीच्या तयारीत दिसत होता.बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभरण्यात पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. बुलढाणा शहराकडून खामगाव कडे येत असताना रस्त्याच्या एका कडेला वाहनांच्या गर्दीमुळे लांडगा थांबलेला दिसला त्याच वेळी या लांडग्याची शिकार करण्यासाठी की काय? बिबट्या आढळून आला. गेल्या काही दिवसात ज्ञानगंगा अभयारण्य बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरत आहे. बिबट्यांचे दर्शन ये- जा करणाऱ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जैवविविधतेने नटलेल्या ज्ञानगंगात इतरही प्राण्यांची संख्या वाढली आहे. परंतु लांडग्याची शिकार बिबट्याने केली का? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही.