spot_img
spot_img

💥एलसीबीची धडाकेबाज कारवाई! – दिगंबर कपाटे यांचा सिनेस्टाईल पाठलाग.. – तीन अट्टल गुन्हेगारांना उचलले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पेट्रोलिंग करीत असताना देऊळगाव राजा येथे ज्वेलर्स दुकान व घरफोडी, मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बुलढाणा एलसीबी पथकाने ताब्यात घेतले असता, त्याने ४ अट्टल गुन्हेगारासह गुन्हे केल्याची कबुली दिली असून, ३ गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ५ ऑगस्ट रोजी

देउळगांव राजा येथे पेट्रोलींग करतांना सदर कारवाई करण्यात आली.रेकॉर्डवरील आरोपी हिरासिंग बावरी रा. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा याने त्याच्या साथीदारांसह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वेलर्स चे दुकान, घरफोडी, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले आहे, अशी माहिती पथकाला देण्यात आली होती. दरम्यान सापळा रचून पथकाने हिरासिंग बावरी याचा देऊळगांव राजा शहरामध्ये शोध घेतला असता तो सरकारी दवाखान्या जवळ दिसला. दरम्यान तो पोलिसांना पाहून पळून जातांना हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी त्याचा पाठलाग करून गीतांजली टॉकीज समोरील नंदन एजन्सी समोर हिरासिंग मोहनसिंग बावरी याला पकडले. त्याला विश्वासात घेवून पंचासमक्ष बुलढाणा जिल्हयातील ज्वेलर्सचे दुकानातील चोरी, घरफोडी, दूचाकी चोरी बाबत सखोल विचारपुस केली असता त्याने पंचासमक्ष त्याच्या साथीदारांसह विविध गुन्ह्याची कबुली दिली. मेहकर येथे कलम ३०५ (अ), ३३४ (१) बी.एन.एस. तसेच मेहकर १७४/२०२५ कलम ३०५ (अ), ३३४ (१) बी.एन.एस.व
देऊळगाव राजा २५१/२०२५ कलम ३३४ (१), ६२ बी.एन.एस. असे गुन्हे आरोपींवर दाखल आहेत.या गुन्ह्यात गुन्हेगार सतनामसिंग ऊर्फ अजयसिंग चंदासिग बावरे रा. देऊळगांव राजा, तकदिरसिंग टिटुसिंग रा. जालना, रोशनसिंग बबलुसिंग टाक रा. संजय नगर दे. राजा, धर्मदरसिंग टाक रा.बीबी,जोगीदरसिंग रणजितसिंग टाक रा. वसमत यांचा सहभाग आहे. या ५ आरोपीपैकी हिरासिंग मोहनसिंग बावरी वय 20 वर्ष, रा सरकारी दवाखान्याचे मागे देऊळगाव राजा, सतनामसिंग ऊर्फ अजयसिंग चंदासिग बावरे वय 38 वर्ष रा देऊळगांवराजा,
रोशनसिंग बबलुसिंग टाक वय 20 वर्ष रा. संजय नगर दे. राजा या तीन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कारवाई करिता वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशन मेहकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

▪️यांनी केली कारवाई!

पीएसआय प्रताप बाजड, पीएसआय अविनाश जायभाये, एएसआय ओमप्रकाश सावळे,एचसी दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम आघाव,वनिता शिंगणे, दिपक वायाळ,
विकास देशमुख या एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!