बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवसागणिक गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून, आता थोड्यावेळापूर्वी चिखली मार्गावरील हाजी मलंग दर्गासमोर एका 19 वर्षीय मुलाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.सनी सुरेश जाधव (19) गौतम नगर, बुलढाणा असे मृतक मुलाचे नाव आहे.
काही वेळापूर्वी सनी सुरेश जाधव आणि येथील भीलवाडा येथे राहणाऱ्या मुलाचा काही कारणास्तव वाद झाला होता.दरम्यान अज्ञात आरोपींनी गौतम नगर येथील सनी सुरेश जाधव यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूचे सपासप वार केले.त्यामुळे सनी जागेवरच कोसळला.रक्त स्त्राव खूप झाल्यामुळे यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.