बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘मलकापूर चिखली मार्गाचे होणार चौपदरीकरण!’ अशी बातमी 7 मे रोजी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने प्रसारित केली होती.वृत्तात ‘चिखली रोडवरील महागड्या जमिनी रस्ते रुंदीकरणात जाण्याची भीती’ व्यक्त करण्यात आल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन, याबाबत आवाज बुलंद केल्याचे समजत आहे. त्यामुळे ‘हॅलो बुलढाणा’ च्या वृत्ताच्या इम्पॅक्टचे सर्वत्र स्वागत होत आहे.
चिखली रोडवरील रस्ते रुंदीकरणात 15 ते 20 हजार स्क्वेअर फुट भावाच्या जमिनी रस्त्याखाली जाणार असल्याचे वृत्त ‘हॅलो बुलढाणा’ ने 7 मे रोजी प्रसारीत करून संकेत दिले होते.दरम्यान आता यासंदर्भात
आमदार श्वेता महाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासोबत चर्चा करून आवाज उठवला आहे.
मलकापूर ते चिखली मार्गाचे चौपदरीकरण होणार असून याची वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया सुरू असली तरी,सदर मलकापूर ते चिखली हा मार्ग सध्या बीओटी तत्त्वावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अधिपत्याखाली आहे.मलकापूर रोडवरील एआरडी सिनेमा हॉल पासून तर चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिर पर्यंत कमालीची रहदारी व वाहनांची वर्दळ असते.चिखली मार्गावर तर अनेकांनी 15 ते 20 हजार रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या, बंगले बांधले.परंतु हा मार्ग नॅशनल हायवे म्हणून नवी ओळख निर्माण करेल. यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 1200 कोटी रुपयांची घोषणा देखील केली आहे.शिवाय नॅशनल हायवे साठी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव,आमदार संजय गायकवाड, आमदार सुख चैन संचेती,
आमदार श्वेता महाले यांचा विशेष आग्रह आहे. विशेष म्हणजे हा मार्ग बुलढाणा अर्बनच्या बीओटी तत्त्वातून काढावा लागणार आहे आणि बुलढाणा अर्बनला देय रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवे महामार्ग होऊ शकते.ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत असतांना आता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित टोल कंपनीला एकरकमी पैसे देऊन हा महामार्ग पुन्हा राष्ट्रीयमहामार्गाच्या अधिकृतांना वर्ग करण्यात येईल असा, दावा केला आहे.या बाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले आहे.त्यामुळे चिखली बुलढाणा मार्गाचे चौपदरीकरण होण्याचा संकेत मिळत असून, हे काम केव्हा पूर्णत्वास जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.














