बिबी (हॅलो बुलढाणा) लोकप्रतिनिधींना झोपेत असताना आणि केवळ फोटोसाठी घटनास्थळी येण्याची सवय असताना, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सहदेव लाड यांनी मात्र प्रत्यक्ष कृतीने माणुसकीचे दर्शन घडवले! काल लोणार तालुक्यातील सावरगाव तेली येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका शेतकरी महिलेला जीवाची पर्वा न करता वाचवणाऱ्या उमेश सौदर, निलेश गाडेकर आणि उमेश लांडगे या तिघा तरुणांचा आज पहाटेच लाड यांनी गावात येऊन सत्कार केला.
या धाडसी कृतीने सावरगावातील ही तरुण त्रिकुट शेतकऱ्यांचे खरे हिरो ठरले. कार्यक्रमाला संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लांडगे, दिलीप तुपकर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहदेव लाड यांनी उपस्थितांना उद्देशून बोलताना, “आपल्या शेतकऱ्यांचा जीव वाचवणारे हेच खरे लोकनायक!” असे ठणकावून सांगितले.