मेहकर (हॅलो बुलडाणा) पाऊस दमदार बरसल्याने मेहेकर तालुक्यातील अंजनी खूर्दच्या नाल्याला काच नदीमुळे पूर आल्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने होत आहे. या नाल्यात 4 शेतकरी अडकून त्यांचा पाण्यातून बाहेर पडण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरू असतांना त्यांना ग्रामस्थांनी जणू मृत्यूच्या जबड्यातूनच बाहेर काढले आहे. हा प्रसंग काळजाचा ठोका चुकवणारा होता.
बुलढाणा जिल्ह्यात कमी अधिक पावसाचा जोर आहे. मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील काच नदीला पावसामुळे अचानक पूर आल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने प्रवाहित होत असतांना, नाल्यात
4 शेतकऱ्यांना ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जीवनदान दिले आहे. रामेश्वर ढोले, अनिता ढोले, छायाबाई पायघन, आणि नम्रता पायघन अशी या वाचवलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सदर
शेतकरी शेतातली कामे आटोपून ते ट्रॅक्टरने घराकडे परतत होते. गावाकडे जाण्याचा रस्ता नाल्यातून असल्याने त्यांनी ट्रॅक्टर ओसंडून वाहणाऱ्या नाल्यातील रस्त्यावर चालवून नेला.मात्र पाण्याच्या प्रवाहाला अत्यंत गती असल्याने ट्रॅक्टर कडेलाच पाण्यात उलटण्याच्या स्थितीत होऊन चारही शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. यापैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत तातडीने गावात फोन करून मदतीची याचना केली.या घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले व मृत्यूच्या दारातून चौघांची सोडवणूक करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या धाडसी मदतीची आहे.