चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल)
शहराच्या चिखली-जालना रोडवर महाबीजजवळ काल बुधवारी रात्री 9:30 वाजता घडलेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश नारायण गिते (वय 37, रा. हिवरा आश्रम) असे या जखमीचे नाव असून, अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की गिते यांना तातडीने जवंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारांनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातावेळी प्रकाश गिते हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून जात होते, आणि महाबीजजवळ अचानक अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पळून गेले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.