spot_img
spot_img

भाईजी म्हणाले.. ‘भारतीय संस्कृती टिकविण्यात महिलाच अग्रेसर!’ – ४ ऑगस्ट पासून शिवमहापुराण कथा!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) हिंदू वर्षातील श्रावण महिना हा एक पवित्र महीना मानल्या जातो. भगवान शंकराचा अत्यंत प्रिय असलेला हा महिना आहे आणि या महिन्यात शंकराची पुजा अर्चा, उपवास, अभिषेक, इत्यादी धार्मिक विधी केले जातात. हे सर्व धार्मिक विधी पार पाडता यावे म्हणुन स‌द्भावना सेवा समितीने बालसंत श्री दिपशरणजी महाराज, चित्रकुट, यांची श्री शिवमहापुराण कथा दि.०४ ऑगष्ट ते १० ऑगष्ट पर्यंत वारकरी भवन, सर्क्युलर रोड, बुलडाणा येथे आयोजित केली आहे. या संदर्भात नुकतीच जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे महिलांची सभा घेण्यात आली. सर्व समाजाच्या महिला मंडळांनी भाग घेवून चर्चा केली. कथेच्या सातही दिवसाची जबाबदारी महिलांनी स्विकारली. हा उत्साह पाहुन भारतीय संस्कृती टिकविण्यात महिलांचे योगदान मोठे आहे असे प्रशंसनीय उद्‌गार स‌द्भावना सेवा समितीचे अध्यक्ष श्री. राधेश्याम चांडक यांनी काढले.

कथेमध्ये सर्व व्यवस्था चोख ठेवावी व ही कथा आनंदोत्सव करावा अश्या सुचना यावेळी केल्या. महिलांच्या सभेत चंपालाल शर्मा, प्रकाशचंद्र पाठक यांनी मार्गदर्शन केले. लाला माधवणी यांनी आभार प्रदर्शन केले.

दि. ०४ ऑगष्ट सोमवार दुपारी १.०० वाजता श्री संत गजानन महाराज मंदिरापासुन ५१ कलशधारी महिला, भजनी दिंड्या, अश्वारुढ रथ यासह शोभायात्रा निघुन वारकरी भवनपर्यंत जाईल व कथेला सुरुवात होईल. प्रथम दिवस परशुराम ब्राम्हण समाज महिला मंडळाने घेतला असुन शिवमहापुराण कथेचे महात्म्य संदर्भात झाँकी प्रस्तुती, समुहनृत्य, प्रसाद वितरण व अभिषेकाची तयारी, आरतीची तयारी या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील. दुसऱ्या दिवशी जैस्वाल समाज महिला मंडळ, तिसरा दिवस जांगीड समाज महिला मंडळ, चौथा दिवस लेवापाटील समाज सखी मंच व गुरव समाज महिला मंडळ, पाचवा दिवस सिंधी समाज, पंजाबी समाज, वर्मा व गुजराथी समाज महिला मंडळ, सहावा दिवस माहेश्वरी समाज महिला मंडळ, सातवा दिवस अग्रवाल समाज महिला मंडळाकडे आहे. या सर्व मंडळाना कुमावत समाज, राजपूत समाज, परदेशी उत्तर भारतीय समाज, माळी समाज, गायत्री परिवार, मराठा समाज महिला मंडळ, इत्यादी महिला मंडळे सहकार्य करतील. या कथे दरम्यान बारा ज्योतीलिंगाची स्थापन केली असुन सर्वांना अभिषेकाचा लाभ घेता यावा म्हणुन रु.१,१००/- सह्योग राशी राहील. पुजेचे सर्व साहित्य समिती उपलब्ध करुन देईल. चित्रकुटचे आचार्य रुद्राभिषेक करवुन घेतील.
महिलांमध्ये सौ.अंजली पराजंपे, सौ.. माधुरी घोरपडे, सौ. शुभांगी चंदन, सौ. निलम बाहेती, भारती झंवर, सौ.. मुक्ता पाटील, सौ. शीतल सोनुने, सौ. रोहिणी काटकर, सौ. कुंदा पाटील, सौ. सुनंदा कावळे, सौ. कल्पना किनगे, सौ. संध्या मिश्रा,सौ.सरोज चांडक, श्रीमती सावित्रीबाई काळे, सौ. आरती, सौ. रूपा, सौ. हंसा, सौ. माया, सौ. मनीषा, सौ. रेखा, सौ. बाली, सौ. जमुना शर्मा,सौ.मोनिका, सौ. सुनंदा, सौ. पौर्णिमा, सौ. पौर्णिमा, सौ.सुवर्णाज्योती जैस्वाल, सौ.रत्ना जैस्वाल, यांनी या चर्चेत सहभाग घेऊन सुचना केल्या, सद्भावना सेवा समितीने आयोजित केलेल्या शिवमहापुरान कथेचा श्रावण महिन्यात सर्वांनी लाभ घेवून पुण्य प्राप्त करावे आणि परमानंद प्राप्त करावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी यावेळी केले. कथा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते आणि विविध महिला मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!