spot_img
spot_img

“फकिरा” ही क्रांतीची मशाल — भाई छोटू कांबळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त चिखलीत अभिवादन

चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) शोषित, वंचित समाजासाठी लेखणीला शस्त्र बनवणारे थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व, सत्यशोधक , जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त चिखली येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी उपस्थितांना बोलताना सांगितले, “आण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्धचा आवाज उभा केला. ‘फकिरा’सारखी कादंबरी ही केवळ साहित्य नव्हे, ती क्रांतीची मशाल आहे. समाजाने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या मार्गावर चालले पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी दाखवलेली दिशा हीच खरी लोकशाहीची वाट आहे.”
या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार संग्रामसिंह पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, विजय किटे तसेच दिलीप काळे, योगेश साळवे, विश्वनाथ कांबळे, गजानन गायकवाड, रमेश घाडगे, सुभाष घाडगे, कृष्ण साळवे उपस्थित राहून यांनी सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी धनंजय साळवे, सत्यम कांबळे, सौरभ बावस्कर, विजय कांबळे, सचिन कांबळे, नागेश अंभोरे, गजानन मिसाळ, अमोल मिसाळ, श्याम सगट, संतोष खरात, सागर कांबळे, स्वप्निल कांबळे, राज नेमाडे, अनिल तायडे, अमोल साबळे, मारोती घाडगे, मंगेश घाडगे, आकाश खंडारे, विशाल साबळे, तसेच चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. नंतर उपस्थितांनी साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत, त्यांच्या साहित्यिक योगदानावर चिंतन व्यक्त केलं. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय फाउंडेशन व सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप “सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी समाजजागृती घडवूया, परिवर्तन निर्माण करूया” या निर्धाराने झाला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!