spot_img
spot_img

स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवावा! – शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणत करावी! – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनात्मक शक्ती वाढवावी, शिवसेना सदस्य नोंदणी ही मोठ्या संख्येत करावी, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे केले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेंगाव ,खामगांव,जळगाव जामोद,मलकापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या आजी-माजी पदाधिकारी यांची
बैठक आज 17 जुलै रोजी शेगाव येथील वर्धमान भवन येथे संपन्न झाली त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा आमदार संजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे,ओमसिंग राजपूत,युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शारदाताई पाटील व्यासपीठावर उपस्थित होत्या शिवसेना नेते प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिकांनी कामाला लागा जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा , सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा ,शासकीय योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्याचं काम ही शिवसैनिकांनी करावं अस आवाहन त्यांनी केले. “शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. या संघटनेची ओळख कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर अवलंबून असल्याचेही शिवसेना नेते प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले . जिल्हा संघटक तथा आमदार संजय गायकवाड यांनी गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक असं जाळ संपूर्ण जिल्हाभर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करण्याबाबत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी खामगांव,जळगाव जामोद, मलकापूर या विधानसभा मतदारसंघांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. बैठकीत
पक्षसंघटना,पक्षशिस्त,पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय यावर भर देत आला. या बैठकीत अनेकांनी मुक्तपणे आपले विचार मांडले आणि संघटनात्मक बळकटीसाठी आवश्यक अशा सूचना केल्यात.
या बैठकीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे शेगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख, संजय आवताडे खामगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भाऊ डीवरे, नांदुरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक टावरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, शिवसेना शिवसेना नेते चेतन पाटील घिवेवे, तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर शेगाव शिवसेना तालुकाप्रमुख मलकापूर विजयजी साठे, शिवसेना तालुकाप्रमुख नांदुरा सुनील जुनारे शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, खामगाव शिवसेना तालुकाप्रमुख केशव ढोकणे, संग्रामपूर शिवसेना तालुकाप्रमुख जळगाव जामोद अजय पारसकर, पवन बारिंगे, उपजिल्हाप्रमुख किसान आघाडी महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मयुरी पाटील शेगाव जयश्री देशमुख खामगाव यांच्या सह शिवसेना- युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!