spot_img
spot_img

ट्रक आणि पॅसेंजर अपेचा अपघात : चिखली-मेहकर रोडवर भीषण टक्कर; एक ठार, एक गंभीर जखमी!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील खैरव फाटा (चिखली-मेहकर रोड) परिसरात काल रात्री 8 वाजता ट्रक आणि पॅसेंजर अपेची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मृतकाचे नाव मधुकर रामचंद्र वाघ (वय 62, रा. आमखेड, ता. चिखली) असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे नातेवाईक सुनील विष्णू वाघ (वय 35, रा. आमखेड) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे हलविण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की, पॅसेंजर अपेचा पुढचा भाग अक्षरशः चकनाचूर झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!