धाड (हॅलो बुलडाणा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मिलन सायकल व टायर दुकानाला 14 जुलै रोजी रात्री 7.30 वा दरम्यान अचानक आग लागली.
या घटनेत सायकल आणि टायर दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळुन खाक झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार 14 जुलै रोजी सायंकाळी मिलन सायकल व टायर दुकान मालक शेख नाजिम शेख रज्जाक हे दुकान बंद करुन घरी गेले असता रात्री 7.30 वाजता बंद दुकानातुन धुर निघताना नागरीकांना निदर्शनास आले. काही वेळेतच संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यावेळी गावातील दोन टॅंकरधारक युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नव्हते.