बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केला जात आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत
मतदार असणारा सामान्य शिवसैनिक आजही मातोश्रीवर निष्ठा ठेवून आहे.आज बुलढाण्यातील शेकडो शिवसैनिक शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले असून, हा प्रस्थापित पक्षांना जबर धक्का असल्याचे मानल्या जात आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा बुलढाणा व देऊळघाट परिसरातील अनेक गावातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहे. दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. सामान्य शिवसैनिका सोबतच विद्यमान सरपंच,माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांचाही समावेश आहे. शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,जिल्हा समन्वयक प्राध्यापक डी एस लहाने यांच्या समन्वयातून सदर शिवसैनिकांनी मातोश्रीचे शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला. प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.