बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सुखी संसाराचे स्वप्न रंगवीत असतानाच भावी नवरदेवाला अपघाती मृत्यूने गाठले.हळदीच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना धोत्रा नंदाईत घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिकडे मेहंदी रंगत होती आणि इकडे हळद लागत होती परंतु नियतीला हे मान्य नव्हते.अखेर नियतीने डाव साधून डॉ. अमोल मुंडे वय 27 रा. धोत्रा नांदाई यांच्यावर घाला घातला. ते अमरावती जिल्ह्यातील भुईखेड रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदाईचे डॉ.अमोल मुंडे यांचे 14 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे लग्न ठरले होते.लग्न पत्रिकांची यादी आणि लग्नपत्रिका वाटपाचे काम अशी सर्व तयारी ते करत होते.त्यांचे कुटुंबीयही आनंदात होते. नवरदेवासह नवरीच्या कुटुंबात देखील चैतन्याचे धुमारे फुटले होते.23 जून रोजी तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असताना,त्यांच्या दुचाकीला अज्ञातत वाहनाने धडक दिली.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.दरम्यान त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.तब्बल 18 दिवसानंतर उपचार करूनही त्यांची प्राणज्योत मलावली आहे.