बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कॅन्टीन मारहाण प्रकरण राज्यभर गाजत असताना, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जहाल टीका करीत ‘लुंगी सोडून कानशिलात लगावण्याचे वक्तव्य केले होते. यावर आम. गायकवाड यांनी देखील जलील यांच्यावर हल्लाबोल करीत ‘इतना मारूंगा.. इतना मारूंगा..’ अशा धमकीचे प्रतिउत्तर दिले. दरम्यान पुन्हा इम्तियाज जलील यांनी ‘जगह आपकी..वक्त आपका..बताईये कहाँ आना है?’असे आम. गायकवाडांना चॅलेंज केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. ‘मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, असे जलील यांनी म्हटले होते. त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले.
‘तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा, या वेटरला तर दोनच घुसे मारले आहेत, तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटले.दरम्यान इम्तियाज जलील यांनी पुन्हा याचे प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘मला धमकाविण्याची भाषा करताहेत.. आमदार गायकवाड साहेब.. जागा तुमची, वेळ तूमची .. सांगा कुठे यायचे आहे? मला तुमच्याशी काही घेणे देणे नाही.परंतू तुम्ही काही चुकीची हरकत करत असाल आणि त्या गरीबासाठी आवाज उठविणारा कोणी नसेल अन् आपले मुख्यमंत्री हसत हसत या प्रकरणा वर उत्तर देत असतील तर अशा गरीबासाठी मी जरूर उभा राहील!’