बुलढाणा (हॅलो बुलडाणा) त्वचारोग, केस आणि नखांच्या समस्या सतावतायत? मग ही संधी गमावू नका! आंबेकर स्किन क्लिनिक, बुलढाणा आणि भारतीय त्वचारोग संघटना (IADVL) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मोफत त्वचारोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. प्रज्वल आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या शिबिरामध्ये मुरुम, खाज, एलर्जी, पांढरे डाग, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन, केसगळती, नखांचे विकार यांसारख्या त्वचाविकारांवर फ्री तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे IADVL द्वारे देशभरात 550 शिबिरे आयोजित करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मानस असून याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे.
हे शिबिर केवळ आरोग्यसंधी नसून, बुलढाण्याच्या सहभागामुळे एक ऐतिहासिक घडी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ: आंबेकर स्किन व श्रीशा डेंटल क्लिनिक, बस स्टँड जवळ, राणा गेस्ट हाऊस शेजारी, बुलढाणा
संपर्क: 8080334900