बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अवैध गर्भपात करणे गुन्हा असून सुद्धा चिखली तालुक्यातील रायपूर येथील खंडागळे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर कडून गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता.दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक व त्यांच्या पथकाने छापा टाकून अवैध गर्भपात करतांना डॉक्टरांना रंगेहात पकडले आहे.
चिखली तालुक्यातील रायपूर येथील अवैध गर्भपाताचा हा धक्कादायक प्रकार आज 12 जुलैला समोर आला आहे. बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चिखली येथून रायपूर डॉक्टरांची टिम बोलावण्यात आली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार स्वतःच्या टिम सह रायपूर येथे पोहचले.दरम्यान डॉ.खंडागळे हॉस्पिटलवर छापा टाकत हॉस्पिटलची झाडा-झडती घेतली असता झालेल्या अवैध गर्भपातचे अवशेष सापडल्याची माहिती आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टर विरोधात कारवाई करण्यात येत आहे. डॉ. उज्वल खंडागळे व डॉ. प्रकाश खंडागळे यांचे हॉस्पिटल असून या ठिकाणी पोलीस देखील पोहचले आहेत.